अंबड येथील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंच्या संघटनांचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

अंबड (जिल्हा जालना) येथे हिंदूसंघटन मेळावा पार पाडला !

कयपंजीने दीपप्रज्वलन करतांना उजवीकडे उद्योजक श्री. विशाल गिल्डा, डावीकडून कु. प्रियांका लोणे आणि श्री. सुनील घनवट

जालना, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – अंबड येथील स्वाभिमानी धर्मनिष्ठ शौर्यवान युवा पिढीने योगदान दिल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही. अंबड येथील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंच्या संघटनांचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. आज संपूर्ण जगभरामध्ये हिंदूंच्या हक्काचे राष्ट्र नाही. जर धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली आहे, तर भारत ‘सेक्युलर’ राष्ट्र कसे ?, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’मध्ये उपस्थित हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना बोलत होते. हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर-जालना जिल्हा समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. अतुल देवकर यांनी सूत्रसंचालन केले. ६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता अंबड येथील ‘श्री स्वामी समर्थ सेवा मंदिरा’च्या सभागृहामध्ये या हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु धर्माभिमान्यांनी भ्रमणभाषची विजेरी लावून पाठिंबा दर्शवला
हिंदूसंघटन मेळाव्यात घोषणा देतांना हिंदु धर्माभिमानी

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, आपल्या हक्काचे राष्ट्र मिळवण्यासाठी आणि त्याची मागणी करण्यासाठी सर्वजण पद, पक्ष, संघटना, संप्रदाय यांची चौकट मोडून आपण हिंदू म्हणून एकत्र आलो आहोत. हा आदर्श अंबड, जालना या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी सर्वांसमोर ठेवला आहे. आज कोणत्याही धर्माभिमानी हिंदू संकटामध्ये असल्यास त्याला एकटे न पाडता सर्वांनी मिळून त्याला सहकार्य करूया आणि संघटन वाढवूया. संघटित हिंदूंच्या शक्तीमुळे हिंदु राष्ट्र घोषित करावे लागणार आहे. वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्र येणार आहे, अशी श्रद्धा ठेवून, उद्या नव्हे, तर आजच कृतीशील व्हा, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदूसंघटन मेळाव्यास १७५ हून अधिक हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते.

गटचर्चेत सहभागी हिंदु धर्माभिमानी

क्षणचित्रे

१. अंबड येथील तरुण धर्मप्रेमींनी या हिंदूसंघटन मेळाव्याची पत्रके छापून. मेळावा यशस्वी होण्यासाठी आणि त्याचा लाभ अधिकाधिक समाजाला व्हावा, यासाठी शहरात प्रसार, प्रसारात स्वतः सहभाग नोंदवला. मेळाव्याच्या दिवशीच्या आयोजनामध्ये सहभाग घेतला.

२. मेळाव्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये ‘हलाल जिहादविरोधी कृती समिती’मध्ये तरुणांनी सहभाग घेतला आणि प्रत्यक्ष कृतीलाही प्रारंभ केला.