दिब्रुगड (आसाम) येथे अज्ञातांकडून शिवमंदिरात तोडफोड करून जाळण्यात आल्या मूर्ती !

दिब्रुगड (आसाम) – येथे २० ऑक्टोबर या दिवशी पहाटे अज्ञाताने चबुआ स्मशानभूमीजवळ असणार्‍या शिवमंदिराची तोडफोड करून त्याला आग लावली. यानंतर शिवाची मूर्ती जाळण्यात आली. याची माहिती मिळताच हिंदू संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली. या भागात मोठ्या प्रमाणात धर्मांतरित ख्रिस्ती रहात असल्याचे सांगण्यात येते. ‘लीगल राइट्स ऑब्झर्व्हेटरी’ या संस्थेने आरोपीवर कारवाई होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे ट्वीट करून मागणी केली आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !