नगर येथील धर्मांधाच्या दुकानातून घातक शस्त्रांचा साठा जप्त !

नगर – येथील ‘आशा टॉकीज’ चौकात ‘अरीशा कलेक्शन’ या दुकानात तलवारी विकत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दुकानावर धाड टाकली आणि तलवारी, गुप्ती, तसेच चाकू अशी २१ हत्यारे आणि हुक्का पार्लरसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या साहित्यांचा साठा कशासाठी करण्यात आलेला होता याविषयी चौकशी चालू आहे. या प्रकरणी ‘अरीशा कलेक्शन’चे मालक हुमायू शेख याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

येथील आशा टॉकीज चौक हा मोठ्या रहदारीचा चौक असून जिल्ह्यातून नगर शहरात खरेदीस येणार्‍या नागरिकांना येथूनच विविध भागांत खरेदीसाठी जावे लागते. अशा वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरच असलेल्या दुकानात ही जीवघेणी शस्त्रे आढळून आली आहेत.

संपादकीय भूमिका 

शस्त्रसाठा सापडणारे दुकान धर्मांधाचे आहे, यातूनच त्यांचा उद्देश लक्षात येतो. अशा दुकानदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !