केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचा स्तुत्य आदेश !
मुंबई – अभिनेते अक्षय कुमार यांच्या ‘रामसेतू’ या चित्रपटात केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून काही पालट सुचवण्यात आले आहेत. त्यांनी चित्रपटाला ‘U/A’ प्रमाणपत्र दिले दिले आहे. ‘चित्रपटाच्या काही संवादांतील ‘राम’ असा उल्लेख ‘श्रीराम’ असा करा, असे सांगितले आहे. मंडळाने चित्रपटातील कोणतेही दृश्य काढून टाकलेले नाही. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
मंडळाने सुचवलेले पालट
१. चित्रपटातील काही संवादांवर मंडळाने आक्षेप घेतला आहे. ‘श्रीराम कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले होते ?’ हे वाक्य पालटून ‘हे सगळे कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवले जाते ?’, असे वाक्य घेण्यास मंडळाने सांगितले आहे.
२. ‘बुद्ध’ यांच्या नावाचा उल्लेख ‘भगवान बुद्ध’ असा करण्यास चित्रपटाच्या निर्मात्यांना मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
३. मारामारीच्या दृश्यात करण्यात आलेल्या श्रीरामाच्या घोषणेचा उल्लेख हटवण्यास सांगितला आहे. चित्रपटाच्या प्रस्तावनेतही काही पालट सुचवले असून प्रेक्षकांना ते व्यवस्थित वाचता यावेत, यासाठी त्याची लांबी वाढवण्याचेही आदेशही दिले आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्म किंवा देवता यांचा अवमान करणार्या सर्वच चित्रपटांमध्ये केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने अशा प्रकारचे पालट सुचवून हिंदु धर्मियांच्या श्रद्धेचा आदर करावा ! |