अयोध्येतील बांधकाम चालू असलेले श्रीराममंदिर पाडून पुन्हा बाबरी बांधण्याचा होता कट !

  • पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिहादी कार्यकर्त्यांच्या चौकशीतील माहिती न्यायालयात सादर !

  • बंदी घातलेल्या पी.एफ्.आय.चा हिंदुविरोधी कट उघड !

नाशिक – अयोध्येत सध्या बांधकाम चालू असणारे श्रीराममंदिर पाडून पुन्हा त्या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्याचा जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा (पी.एफ्.आय.चा) कट होता. यासंदर्भात इस्लामी देशांमधील सदस्यांसमवेत या संघटनेचे जिहादी कार्यकर्ते संपर्कात होते, असा दावा सरकारी अधिवक्त्यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयासमोर केला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) सप्टेंबर मासात अटक केलेल्या या संघटनेच्या ५ कार्यकर्त्यांच्या चौकशीमधून ही माहिती समोर आली आहे.

संपूर्ण भारत इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी बाबरी मशीद पुन्हा बांधण्याचा डाव होता, असे या चौकशीत समोर आले. सप्टेंबर मासात संपूर्ण देशभरात धाडी टाकून पी.एफ्.आय.च्या शेकडो जिहादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तिच्यावर बंदी घातली. या संघटनेकडून वर्ष २०४७ मध्ये भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र होते, असे उघड झाले होते. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ठार मारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता, हेही समोर आले होते.

राज्यातून अटक केलेले हे ५ कार्यकर्ते सध्या आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात आहेत. ते परदेशात जाऊन आले होते. त्यांच्या खात्यांवर परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसेही जमा झाले आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांचा व्हॉट्सअप गट बनवण्यात आला आहे. त्याचा अ‍ॅडमिन (नियंत्रक) पाकिस्तानमधील असल्याची माहिती समोर आलेली आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न जिहादी आतंकवादी करतात, तरी देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘त्यांना धर्माशी जोडू नये’, असे सांगून त्यांची नेहमीच पाठराखण करतात !
  • अयोध्येतील श्रीराममंदिरावर जिहाद्यांचा नेहमीच वक्रदृष्टी असणार असल्याने हिंदूंनी त्याच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यासह केंद्र सरकारने जिहाद्यांची कीड नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक !