हिंगोली येथे ‘यू ट्यूब’वरील व्हिडिओ पाहून युवकाची आत्महत्या

प्रतिकात्मक छायाचित्र

डोंगरकडा (जिल्हा हिंगोली) – येथील २२ दिवसांपासून बेपत्ता असणार्‍या युवकाचा मृतदेह डोंगरकडा उपबाजारपेठेच्या पत्र्याच्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत १२ ऑक्टोबरला आढळला. पोलिसांनी त्याचा भ्रमणभाष पडताळल्यावर त्याने ‘आत्महत्या कशी करावी आणि कोणत्या प्रकारामुळे विनासायास मृत्यू येतो’, याची पहाणी ‘यू ट्यूब’वर केल्याचे ‘हिस्ट्री’तून समजले.

तो इयत्ता ११ वीत शिकत होता. त्याच्या खोलीत कर्मचारी स्वच्छतेसाठी गेल्यावर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला; मात्र २२ दिवस झाल्याने त्या ठिकाणी केवळ सापळाच दिसत होता. घरची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणावरील खर्च यांमुळे त्याने हे पाऊल उचलले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

सामाजिक संकेतस्थळांच्या आहारी गेलेली आणि संयम संपत चाललेली आजची तरुणाई !