(म्‍हणे) ‘विद्या हवी असेल, तर सरस्‍वतीला आणि पैसा हवा असेल, तर लक्ष्मीला पटवा !

उत्तराखंडमधील भाजपचे आमदार बंशीधर भगत यांचे संतापजनक विधान

हल्‍दानी (उत्तराखंड) – विद्या हवी असेल, तर सरस्‍वतीला पटवा, शक्‍ति हवी असेल, तर दुर्गेला पटवा आणि पैसा हवा असेल, तर लक्ष्मीला पटवा, असे विधान भाजपचे आमदार बंशीधर भगत यांनी आंतरराष्‍ट्रीय बालिका दिनाच्‍या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्‍येने महिला आणि विद्यार्थिनी उपस्‍थित होत्‍या. या वेळी मंचावर उपस्‍थितांनी या विधानाला जोरात हसून दाद दिली. या कार्यक्रमाला उत्तराखंडच्‍या महिला विकासमंत्री रेखा आर्य याही उपस्‍थित होत्‍या.

भगत पुढे म्‍हणाले की, पुरुषांकडे असतेच काय ? एक शिवजी (भगवान शिव) आहेत, जे डोंगरात जाऊन पडले आहेत. त्‍यांच्‍या डोक्‍यावर साप ठेवला आहे. भगवान विष्‍णु हे खोल समुद्रात जाऊन लपले आहेत. दोघांचे एकमेकांशी बोलणेही होत नाही.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंना आणि त्‍यांच्‍या नेत्‍यांना धर्मशिक्षण नसल्‍याने त्‍यांना देवतांचे आध्‍यात्मिक महत्त्व ठाऊक नाही, याचेच हे विधान दर्शक आहे !
  • महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्‍यावरून आमदार टी. राजा सिंह यांच्‍यावर कारवाई करणारा भाजप बंशीधर भगत यांच्‍यावर कारवाई करणार का ?, असा प्रश्‍न हिंदूंच्‍या मनात उपस्‍थित होत आहे !