नागपूर जिल्ह्यामध्ये ‘स्वाईन फ्लू’चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर

‘स्वाईन फ्लू’ने मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्के

नागपूर – जिल्ह्यामध्ये २४ घंट्यांमध्ये २ नवीन ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त व्यक्ती आढळल्या. या आजाराने ८ मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ‘स्वाईन फ्लू’मुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्के नोंदवले गेले आहे. शहरातील रुग्ण संख्या ३३२, ग्रामीण भाग १०९, तर जिल्ह्याबाहेरील १८० अशी एकूण ६२१ रुग्णांवर पोचली आहे.