धारणी (जिल्हा अमरावती) येथील महिला ग्रामसेवकासह सरपंचांना लाच घेतांना अटक !

अमरावती – शौचालयाच्या बांधकामाचे देयक संमत करण्यासाठी बोनो येथील महिला ग्रामसेवक शुभांगी कोकाटे आणि सरपंच सविता कांडे यांना ४० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २९ सप्टेंबर या दिवशी रंगेहात पकडले. मेळघाटातील सर्वच खेड्यांतील शौचालयांच्या बांधकामात पुष्कळ प्रमाणात अनियमितता असून आदिवासी कुटुंब एकाही शौचालयाचा वापर करत नाहीत. शुभांगी कोकाटे आणि सविता कांडे यांनी शौचालय बांधकामाचे दीड लाख रुपयांचे देयक संमत करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे ६० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. शेवटी ४० सहस्र रुपयांवर तडजोड झाली. त्यानंतर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराने पोखरलेले लोकप्रतिनिधी !