आता श्रीदुर्गादेवीची पूजा केल्यामुळे भाजपच्या नेत्या रूबी खान यांना मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमक्या !

गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्यामुळे मिळाल्या होत्या धमक्या !

श्री दुर्गादेवाची पूजा करताना भाजपच्या नेत्या रूबी खान

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील भाजपच्या नेत्या रूबी खान यांना आता नवरात्रीमध्ये श्री दुर्गादेवाची पूजा केल्यावरून मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. यापूर्वी गणेशोत्सवामध्ये त्यांनी त्यांच्या घरी श्री गणेशाची स्थापना केल्यावरून त्यांना अशाच धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यांच्या विरोधात फतवाही काढण्यात आला होता. २ वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या घरी ‘राम दरबार’ आयोजित केला होता. त्यानंतर त्यांच्यावर आक्रमणही करण्यात आले होते.

जिवंत जाळण्याचे चिथावणीखोर आवाहन !

रूबी खान यांच्या विरोधात जागोजागी पत्रके लावण्यात आली असून त्यांवर ‘काफीर’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच ‘त्यांना आणि त्यांच्या कुटुंंबियांना बहिष्कृत करून जिवंत जाळले पाहिजे’ असेही या पत्रकावर लिहिले आहे. याविषयी पोलिसांना कळवण्यात आले असून रूबी खान यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहीत संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे.

याविषयी रूबी खान यांचे पती आसिफ खान यांनी म्हटले की, आम्ही हिंदु-मुसलमान एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र काही लोक आम्हाला अपकीर्त करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • अशा धमक्यांच्या विरोधात एकही मुसलमान नेता, मुसलमान संघटना अथवा मुसलमान विचारवंत पुढे येऊ बोलत नाही कि आंदोलन करत नाही, हे लक्षात घ्या !
  • एखाद्या मुसलमानाने हिंदूंप्रमाणे धार्मिक कृती केली, तर त्याला मुसलमान विरोध करतात, तर हिंदूंनी मुसलमानांप्रमाणे धार्मिक कृती केली, तर त्याचे कौतुक केले जाते, हे लक्षात घ्या !
  • उठसूठ हिंदूंना सर्वधर्म समभावाचे आणि धर्मनिरपेक्षतेच्या डोस पाजणारे आता गप्प का ?