रशियातील शाळेमधील गोळीबारात लहान मुलांसह १३ जणांचा मृत्यू

  • गोळीबार करणार्‍याची आत्महत्या

  • गोळीबार करणार्‍याच्या शर्टवर होते नाझीचे चिन्ह !

इजेव्स्क (रशिया) – येथील शाळेत झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये ७ लहान मुलांचा समावेश आहे. गोळीबारानंतर गोळीबार करणार्‍याने आत्महत्या केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली; मात्र या गोळीबारामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यासह गोळीबार करणार्‍याची ओळखही पटलेली नाही. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, गोळीबार करणार्‍याने काळा शर्ट घातला होता, ज्याच्यावर नाझीचे चिन्ह होते. त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र सापडलेले नाही. त्याची ओळख पटवली जात आहे.