पाकिस्तान : सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाहित मुसलमानाशी विवाह

कुनरी (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कुनरी येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्यापेक्षा ३ पटीने मोठ्या विवाहित मुसलमान पुरुषाबरोबर तिचा विवाह लावण्यात आला. या पीडित मुलीच्या नवर्‍याची मुले तिच्यापेक्षाही वयाने मोठी आहेत, असे वृत्त ‘व्हॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ने ट्विटरवर प्रसारित केले आहे.