ज्ञानवापीतील शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट

(कार्बन डेटिंग म्हणजे एखाद्या वस्तूचे आर्युमान शोधणे)

ज्ञानवापी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयामध्ये आणखी एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यात ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या वेळी सापडलेल्या शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिकाही आधीच्याच याचिकाकर्त्या ४ महिलांकडून करण्यात आली आहे.