एन्.आय.ए.ने आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे घातलेल्या छाप्यांत पी.एफ्.आय.च्या आतंकवाद्यांना अटक !

भाग्यनगर (तेलंगाणा) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, म्हणजेच एन्.आय.ए.ने १८ सप्टेंबर या दिवशी आंध्रप्रदेश, तसेच तेलंगाणा या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी हिंसा भडकावणे, अवैध कृत्ये करणे, तसेच आतंकवादी कृत्यांशी संबंधित आरोपांच्या चौकशीसाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या जिहादी आतंकवादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना अटक केली आहे.

१. मिळालेल्या माहितीनुसार एन्.आय.ए.च्या एकूण २३ पथकांनी आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांमधील काही जिल्ह्यांत छापेमारी केली आहे.

२. आंध्रप्रदेशमधील कर्नूल, गुंटूर, नेल्लोर आणि नंदयाल, तर तेलंगाणामधील इंदूर (निझामाबाद) या जिल्ह्यांत ही कारवाई करण्यात आली आहे.

३. याआधी पी.एफ्.आय.चा जिल्हा निमंत्रक शादुल्लाह आणि सदस्य महंमद इम्रान, महंमद अब्दुल मोबीन यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय.’ अनेक भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतली आहे. ‘पी.एफ्.आय.’ला भारताला वर्ष २०४७ मध्ये इस्लामी राष्ट्र घोषित करायचे आहे. त्यामुळे आता केवळ कारवाईपुरते सीमित न रहाता पी.एफ्.आय.वर कायमस्वरूपी बंदीच आणायला हवी ! बंदी असलेल्या ‘सिमी’प्रमाणे तिच्या छुप्या कारवाया चालू रहाणार नाहीत, यासाठीही उपाययोजना आखणे आवश्यक आहे !

एन्.आय.ए.कडून छापे मारले जात असतांना स्थानिकांचा विरोध !

नंदयाल आणि कर्नूल या भागांत एन्.आय.ए. त्याची कारवाई करत असतांना स्थानिकांनी त्यास विरोध केला. कारवाईच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

संपादकीय भूमिका

जिहादी पी.एफ्.आय.चे समर्थक असलेल्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !