फरीदकोट (पंजाब) येथे गुरुद्वारामध्ये २ गटांत हिंसाचार : तिघांना अटक

फरीदकोट (पंजाब) – येथील गुरुद्वारा साहिबमध्ये शिखांच्या २ गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात काही जण घायाळ झाले. या वेळी तलावारींचा वापर करण्यात आला.

गुरुद्वारा साहिबमध्ये त्याच्या अध्यक्षपदाविषयीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात वर्तमान अध्यक्ष आणि समितीचे सदस्य, तसेच माजी अध्यक्ष उपस्थित होते. जेव्हा अध्यक्ष बोलू लागले, तेव्हा माजी अध्यक्षांनी त्यांच्याशी वाद घालण्यास चालू केल्यावर हिंसाचार झाला. दोन्ही गटांनी तलवारीद्वारे एकमेकांवर वार केले. या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर तिघांना अटक करण्यात आली आहे.