पुणे येथे कर्जदार आणि पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या !

पुणे – चारचाकी वाहनावर कर्ज घेतांना जामीनदार झालेल्या राजेंद्र उपाख्य राजू राऊत या व्यक्तीने कर्जदार आणि पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस फौजदार भाग्यवान निकम, हवालदार सचिन बरकडे आणि कर्जदार किरण भातलवांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याविषयी राऊत यांच्या २३ वर्षीय मुलीने ‘नोटीस बजावत त्यांच्याकडून पैसे उकळून त्रास देत त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले’, अशी तक्रार प्रविष्ट केली होती. (पोलीस हे जनतेला त्रास देण्यासाठीच आहेत, असे या घटनेतून दिसत नाही का ? – संपादक)