‘विकसनशील ते विकसित देश’ अशी भारताची वाटचाल आज वेगाने होत आहे. संपूर्ण जगासाठी भारत देश ‘विश्वदीप’ किंवा आधारस्तंभ ठरत असल्याने सर्व देश भारताकडे आशेने पहात आहेत. अर्थात् एखाद्याची प्रगती किंवा भरभराट ही दुसर्यांना खुपतच असते. भारतही याला अपवाद नाही. भारत जरी प्रगतीपथावर असला, तरी अनेक देश आज भारताला नष्ट करण्याचे मनसुबे रचत आहेत. ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा प्रवक्ता अबू उमर-उल्-मुजाहिर याने मुसलमानांना चिथावणी देत म्हटले, ‘‘इस्लामला वाचवण्यासाठी भारतावर आक्रमण करा. पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपीन्स, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर येथील मुसलमानांनी एकत्र येऊन भारतावर आक्रमण करावे.’’ हेच कमी म्हणून कि काय, श्रीरामजन्मभूमी खटल्यातील एक पक्षकार हाजी महबूब यांनीही धमकीच्या वादात उडी घेत म्हटले, ‘‘अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या निकालाप्रमाणे ज्ञानवापीच्या संदर्भात काही घडले, तर ते योग्य होणार नाही. रा.स्व. संघाला हाताशी धरून सरकार काही चुकीचे करील, तर रक्तपाताविना काही होणार नाही.’’ रक्तपात काय किंवा आक्रमण काय, जणूकाही भारताला संपवण्याचा विडाच या सर्वांनी उचलला आहे. धर्मनिरपेक्ष भारतासाठी येणारी ही परिस्थिती भीषण आणि बिकट ठरणार आहे. धमक्या, चिथावण्या यांचे चक्र प्रतिदिन चालू झाले आहे; पण याविषयी भारतातील एकही मुसलमान संघटना, नेता किंवा सामाजिक कार्यकर्ता बोलत नाही किंवा विरोधही करत नाही. येथेच पाणी मुरते. ‘इस्लामिक स्टेट’ किंवा मुसलमान पक्षकार यांना अशांचा पाठिंबा आहे’, असे भारतातील हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? हिंदू आणि भारत देश यांच्या विरोधात वारंवार मुसलमानांना उकसवले जाते. सूड उगवण्याची भाषा केली जाते. ‘रक्ताचे पाट वहातील’ किंवा ‘शस्त्रांचा वापर करू’, अशा धमक्या उघडपणे दिल्या जातात. हिंदूबहुल भारताने हे आणखी किती काळ सहन करायचे ? किती काळ सहिष्णु रहायचे ? भारतियांच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेतला जात आहे. दहशत माजवली जात आहे. एरव्ही कधी एखाद्या पीडित हिंदूने स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला, तर तोच कसा चुकला आहे, हे बिनदिक्कतपणे सांगत संपूर्ण कारवाईच त्याच्यावर उलटवली जाते; पण आज हे मुसलमान किंवा आतंकवादी संघटना इतक्या मोठ्या प्रमाणात कायदाद्रोही विधाने, आवाहने करत असतांना त्यांच्यावर ना कुठली कारवाई होते, ना त्यांना कुणी विरोध करते ! भारतद्वेषाचे मूळच या भूमीत खोलवर रुजत असल्याचे यावरून लक्षात येते.
सरकारचे कर्तव्य !
ज्ञानवापीच्या खटल्याविषयी रक्तपाताची भाषा वापरणार्या पक्षकारांनी न्यायालयाच्या निर्णयाला न जुमानणे म्हणजे एकप्रकारे राज्यघटनेलाच विरोध केल्यासारखे आहे. देशातील कायदा-सुव्यवस्थेला लाथाडणार्या अशांना भारतात रहाण्याचा अधिकारच काय ? न्यायालयाच्या निर्णयाला अयोग्य मानणारे हे कोण ? ‘श्रीरामजन्मभूमीचा निकाल आम्ही स्वीकारला आहे’, असे वरवर दाखवायचे आणि विरोधाला विरोध करत रहायचा. त्यात कोणतेही तथ्य नसते. उत्तरप्रदेशमधील ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी मुसलमानांना आवाहन केले, ‘‘मदरशांच्या सर्वेक्षणाची नोटीस घेऊन येणार्यांचे स्वागत चपलांनी करावे.’’ हिंदूंनो, प्रत्येक मुसलमान स्वत:च्या धार्मिक स्थळांविषयी किती संवेदनशील असतो, हे लक्षात घ्या ! मठ-मंदिरे यांच्या संदर्भात असा प्रकार घडल्यास हिंदूंना तर कसलेही सुवेरसुतकच नसते. अर्थात् मौलानांच्या भूमिकेकडे कानाडोळा करून चालणार नाही. त्यांनी दिलेली चिथावणी पहाता इस्लामची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हेच प्रकर्षाने जाणवते. स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणार्या भारतात अशा प्रकारच्या धमक्या, आवाहने, चिथावण्या यांनाच जर नागरिकांना सामोरे जावे लागत असेल, तर ‘याला स्वातंत्र्य तरी म्हणावे का ?’, हा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. हिंदुत्वाच्या सूत्रावरून सत्तेत आलेले सरकार याविरोधात कारवाईची पावले कधी उचलणार ? भारतावर आक्रमण करण्याची धमकी देणार्यांची तोंडे आपण कधी बंद करणार ? त्यांना ‘जशास तसे’ प्रत्युत्तर कधी देणार ? आक्रमण केल्यावर किंवा अन्याय झाल्यावर कारवाईची भूमिका घेणारे सरकार भारतियांना अपेक्षित नाही.
विश्वविजयी भारताला उलथवून टाकण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. रात्र आणि दिवस दोन्ही वैर्याचे आहेत. त्यामुळे केवळ भारतच नव्हे, तर भारतातील नागरिक, हिंदू, मंदिरे या सर्वांकडेच वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होऊ नये, इतकी कणखरता सरकारने दाखवायला हवी. दहशत माजवणार्यांच्या विरोधात वारंवार कारवाई व्हायलाच हवी. त्यांच्यावर कठोर निर्बंध घालायला हवेत. तसे झाल्यासच भारत खर्या अर्थाने सुरक्षित होईल. गेल्या ३ दशकांपासून देशात वाढणार्या जिहादी आतंकवादाकडे सरकारने दुर्लक्ष करू नये.
नागरिकांनो, राष्ट्रप्रेम निर्माण करा !
सद्यःस्थिती पहाता भारतातील हिंदूंनी आता वेळीच शहाणे व्हायला हवे. सरकारवर अवलंबून न रहाता देशकर्तव्य पार पाडायला हवे. मुसलमानांकडून देण्यात आलेल्या चिथावण्यांमुळे घाबरून न जाता स्वतःत राष्ट्रप्रेम जागृत करून त्यांना लढाऊ वृत्तीने सामोरे जायला हवे. निधर्मी लोकशाहीत धर्मांधांची हुकूमशाही चालू द्यायची नाही. आता काळही आला आहे आणि वेळही आली आहे. त्यामुळे सुस्त होऊन चालणार नाही. प्रत्येकाने स्वतःच्या रक्षणाचे दायित्व स्वतः घ्यायला हवे. यातून स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अपरिहार्यता पुन्हा एकदा अधोरेखित होते. सर्व नागरिकांनी वैध मार्गाने लढा देण्याचा निश्चय केल्यासच या भयावह संकटाचा सामना करता येईल आणि या भारतात धमकी, चिथावणी, हिंसक आवाहने यांचा आवाज कायमचा नष्ट होऊन केवळ अन् केवळ भारतभूचेच गौरवगान केले जाईल. तो दिवस आता दूर नाही, हे भारतद्वेष्ट्यांनी लक्षात ठेवावे !
भारताकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होऊ नये, अशी कणखर भूमिका सरकारने घ्यावी ! |