उत्तरप्रदेशचे मंत्री आणि निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांचे आवाहन !
बागपत (उत्तरप्रदेश) – मुसलमानांनी मंदिराजवळ असणार्या मशिदींना स्वतः हटवून त्या दुसरीकडे बांधल्या पाहिजेत. अयोध्येत आता भव्य श्रीराममंदिर बांधले जात आहे, तसेच अन्यत्रही मशिदी दुसरीकडे नेल्यास संघर्षाची स्थिती येणार नाही, असे विधान उत्तरप्रदेशचे मंत्री आणि निषाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांनी केले आहे. ते येथे एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.
UP’s Fisheries minister Sanjay Nishad has called for the removal of all mosques located near temples.https://t.co/fZHkIypdGx #Mosques #Temples
— The Siasat Daily (@TheSiasatDaily) September 15, 2022
उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांचे सर्वेक्षण केले जात आहे. यावर संजय निषाद म्हणाले की, सरकार मुसलमान तरुणांना सुविधा देऊन चांगले शिक्षण देऊ इच्छित आहे; (मुसलमानांना चांगले शिक्षण दिले, तर त्यातील काही जिहादी कारवाया करणार नाहीत, असे म्हणता येणार नाही; कारण अनेक जिहादी आतंकवादी सुशिक्षित होते, असे आतापर्यंत समोर आलेले आहे ! – संपादक) मात्र मदरशांचे नाव नेहमीच संशयित कारवायांसाठी जोडले जाते. भाजप मुसलमानांना सुशिक्षित करू इच्छितो; (मुसलमानांना सुशिक्षित करण्यासह त्यांच्यातील काही जणांची जिहादी मानसिकता नष्ट होण्यासाठी प्रयत्न करणे अधिक आवश्यक आहे ! – संपादक) मात्र मौलाना (इस्लामी अभ्यासक) आणि विरोधी पक्ष यांना त्रास होतो; कारण यामुळे त्यांचे राजकारण संपेल.