पाकिस्तान अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार  ! – नेड प्राइस

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले की, आतंकवादाच्या विरोधातील युद्धात पाकिस्तान हा अमेरिकाचा महत्त्वाचा भागीदार आहे. अमेरिका पाकिस्तानला ‘एफ्-१६’ लढाऊ विमाने विकणार आहे, तसेच कोट्यवधी रुपयांचे आर्थिक साहाय्यही करणार आहे. ‘या लढाऊ विमानांचा ताफा पाकिस्तानला आतंकवादाच्या विरोधात मोहीम राबवण्यास साहाय्य करेल’, असे अमेरिकन सरकारने म्हटले आहे. (अमेरिका हा भारताचा छुपा शत्रू आहे, हे यातून परत एकदा स्पष्ट झाले ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पाकिस्तानला महत्त्वाचा भागीदार समजणार्‍या अमेरिकेवर भारताने कधीही विश्‍वास ठेवू नये !