श्राद्धाचे प्रकार आणि त्यांचे लाभ

#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi

माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. कालच्या अंकात श्राद्धकर्त्याच्या ७ गोत्रांतील गती मिळणारी १०१ कुळे यांविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपण पाहिली. आज श्राद्धाचे प्रकार आणि त्यांचे लाभ, हे पाहूया. यातून श्राद्धाचे महत्त्व अधोरेखित होते.

पितृपक्ष विशेष

श्राद्धाच्या देवता

१. पुरुरव-आर्द्रव आणि धूरि-लोचन

पुरुरव-आर्द्रव आणि धूरि-लोचन हे पितरांचे विश्वेदेव आहेत. श्राद्धात यांचा उल्लेख केला जातो.

२. वसु-रुद्र-आदित्य

अ. ‘श्राद्धाचा संबंध वसु, रुद्र आणि आदित्य या पितरांच्या अधिष्ठात्री देवतांशी आहे. श्राद्धमंत्र आणि विधी हे या देवतांशी संपर्क साधून देतात.’
आ. ज्याला उद्देशून श्राद्ध करायचे त्या मृत व्यक्तीची वसुगणांत गणना होते, त्याच्या माता-पित्याची रुद्रगणांत आणि आजी-आजोबांची आदित्यगणांत गणना होते; म्हणून श्राद्धाच्या वेळी वसु-रुद्र-आदित्य यांचे प्रतिनिधी म्हणून पिता-पितामह-प्रपितामह (किंवा माता-पितामही-प्रपितामही) यांचा उच्चार केला जातो.

१. श्राद्धाचे मुख्य आणि प्रचलित प्रकार

मत्स्यपुराणात म्हटले आहे, ‘नित्यं नैमित्तिकं काम्यं त्रिविधं श्राद्धमुच्यते । – मत्स्यपुराण, अध्याय १६, श्लोक ५’ अर्थात नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे श्राद्धाचे तीन मुख्य प्रकार आहेत. यमस्मृतीमध्ये वरील तीन प्रकारांसह नांदी श्राद्ध आणि पार्वण श्राद्ध हेही मुख्य प्रकार सांगितले आहेत.

शास्त्रामध्ये एकूण ९६ प्रकारची श्राद्धे सांगितलेली आहेत. त्यांपैकी एकोद्दिष्ट, सपिंडीकरण, पार्वण, महालय आणि नांदी हे पाच प्रकार प्रचलित आहेत.

१. नित्य श्राद्ध : दर दिवशी केल्या जाणार्‍या श्राद्धाला नित्य श्राद्ध म्हणतात. हे केवळ उदकाने तर्पण करून किंवा तीलतर्पण करून करता येते.

२. नैमित्तिक श्राद्ध : मृतात्म्यासाठी केली जाणारी एकोद्दिष्ट वगैरे प्रकारची श्राद्धे ही नैमित्तिक श्राद्धे आहेत.

२ अ. मरणोत्तर विविध श्राद्धे केल्यामुळे पितरांना आणि श्राद्ध करणार्‍यांना होणारे लाभ : पुढे दिलेली श्राद्धे ही चढत्या क्रमाने फलप्राप्ती करून देतात. ती केल्याने त्या त्या स्तरावरील फलप्राप्तीच्या प्रमाणात पितर पुढच्या पुढच्या गतीला प्राप्त होतात. त्यांचे पृथ्वीवरील सजीव अन् निर्जीव घटकांशी असलेले बंध संपुष्टात येण्यास साहाय्य होऊन ते आणि श्राद्ध करणारे यजमान मुक्त जीवन जगू शकतात. पितरांना इष्ट गती प्राप्त झाल्याने साधना करतांना यजमान अन् त्याच्या कुटुंबियांना येणार्‍या अडचणींचे प्रमाणही अल्प झाल्याने त्या सर्वांना साधना करणे सुकर होते.

२ आ. एकोद्दिष्ट श्राद्धे (केवळ एकाला म्हणजे दिवंगत व्यक्तीला उद्देशून केली जाणारी श्राद्धे)

२ आ १. पाथेय श्राद्ध (मृत्यूनंतर पहिल्या दिवशी करावयाचे श्राद्ध) : मृत्यूनंतर पहिल्या दिवशी अंत्येष्टी विधीमध्ये, म्हणजेच प्रत्यक्ष देहाचे अग्नीत दहन होतांना देहातून अनेक रज-तमात्मक टाकाऊ वायू बाहेर पडत असतात. या वायूंना प्रथम गती देऊन मृतदेहाला मार्गस्थ करणे, म्हणजेच पाथेय श्राद्ध.

या विधीमध्ये विधीयुक्त संकल्पातील मंत्रशक्तीमुळे उपप्राणांच्या समवेत असलेले देहातील टाकाऊ वायूंचे सूक्ष्म धाग्यांच्या रूपातील संबंध संपुष्टात येऊन देह हलका होऊन प्रत्यक्ष गती धारण करतो. यानंतरच मृतदेहाचे रूपांतर प्रेतात होण्यास आरंभ होतो.

२ आ २. नग्नप्रच्छादन श्राद्ध (मृत्यूनंतर पहिल्या दिवशी करावयाचे श्राद्ध) : यातून प्रक्षेपित होणार्‍या मंत्रोच्चाराशी संबंधित लहरींमुळे प्रेताच्या स्थूलदेहाशी संबंधित रज-तमात्मक टाकाऊ वायूंचे विघटन होण्यास साहाय्य होऊन त्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते.

२ आ ३. नवश्राद्ध (मृत्यूनंतर पहिले नऊ दिवस प्रतिदिन एक याप्रमाणे करावयाचे श्राद्ध) : त्या त्या दिवशी वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे लिंगदेहावर आलेल्या त्रासदायक आवरणाचे उच्चाटन या श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे केले जाते.

२ आ ४. अस्थीसंचयन श्राद्ध (दहनक्रियेनंतर अस्थीसंचयन करावयाच्या दिवशी करावयाचे श्राद्ध) : या श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींतून लिंगदेहाचे त्याच्या हाडांशी असलेले उपप्राणात्मक आसक्तीयुक्त रज-तमात्मक बंध तोडून टाकून लिंगदेहाला त्यात बद्ध असलेल्या रज-तमात्मक स्थूलदेहाच्या आसक्तीयुक्त संस्कारातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो.

२ आ ५. वेदिका श्राद्ध (वायस पिंड) (दशमदिन विधी) (दहाव्या दिवशी करावयाचे श्राद्ध) : दहाव्या दिवशी लिंगदेहाला काकस्पर्शाच्या माध्यमातून मंत्रोच्चाराने भारित पिंडयुक्त हविर्भाग दिला जाऊन लिंगदेहातील अन्नदर्शक आसक्तीयुक्त रज-तमरूपी संस्कारात्मक बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न करून पृथ्वीमंडल भेदण्यासाठी आवश्यक बळ पुरवले जाते.

व्यक्ती मृत झाल्यानंतर प्रतिदिन दहा दिवसांपर्यंत पिंडदान सांगितलेले आहे; पण कालपरत्वे ते सर्वसाधारणतः दहाव्या दिवशी एकदम केले जाते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)

(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org

Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English

(चित्रावर क्लिक करा)