स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद ज्योतिष पीठाचे, तर स्वामी सदानंद शारदा पीठाचे प्रमुख

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी घोषित

डावीकडून स्वामी सदानंद आणि स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) – बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठ आणि द्वारका येथील शारदा पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या उत्तराधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली आहे. स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना ज्योतिष पीठाचे, तर स्वामी सदानंद यांना शारदा पीठाचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे.  शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या पार्थिवासमोर ही घोषणा करण्यात आली.