भोपाळ (मध्यप्रदेश) – द्वारका आणि ज्योतिष पीठांचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्यावर मध्यप्रदेशच्या नरसिंहपूर येथील परमहंसी गंगा आश्रमामध्ये भू समाधी देण्यात आली. ११ सप्टेंबर या दिवशी वयाच्या ९९ वर्षी त्यांनी नरसिंहपूरच्या झोतेश्वर आश्रमामध्ये देहत्याग केला होता.
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंदांना दिली गेली भू-समाधी: वैदिक मंत्रोच्चार व धार्मिक प्रथेनुसार देण्यात आला अखेरचा निरोप#Shankaracharya https://t.co/DmWNgcRHF2
— Divya Marathi (@MarathiDivya) September 12, 2022
भू समाधीचा विधी झोतेश्वरचे शास्त्री रविशंकर महाराज आणि काशीतून आलले विद्वान यांनी केला. तत्पूर्वी शंकराचार्यांच्या पार्थिवाला सर्व तीर्थांतून आणलेल्या पाण्याने स्नान घालून अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.