सोलापूर – शासनाचा मिरवणुकीतील मूर्तीविषयी कोणताही आदेश नसतांना सोलापूर महापालिका प्रशासन ३ फुटांहून अधिक उंच मूर्तीचे शहरात विसर्जन करण्यास निर्बंध का लादत आहे ? असा प्रश्न सोलापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी उपस्थित केला. श्री गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. सोलापूर महापालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाचे कारण पुढे करत ३ फुटांहून अधिक उंच मूर्ती सिद्धेश्वर तलाव आणि संभाजी महाराज तलाव यांठिकाणी विसर्जित न करता त्या खणीमधील पाण्यात विसर्जित कराव्यात, असे सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतानां अमोल शिंदे म्हणाले, ‘‘३ फूट उंचीच्या मूर्तीच्या विसर्जनाला शहरामध्ये बंदी का करण्यात आली ? उद्या २ फुटाच्या मूर्तीलाही निर्बंध आणाल.’’