‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे ‘ॲप’ लावून श्री गणेशमूर्तीची विधीवत् प्रतिष्ठापना करतांना केडगाव, पुणे येथील धर्मप्रेमी वैद्य नीलेश निवृत्ती लोणकर यांना आलेली अनुभूती !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने…

१. श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत असतांना मूर्तीच्या हृदयावर हात ठेवल्यावर स्पंदने जाणवणे

‘१०.९.२०२१ (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) या दिवशी मी ‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’च्या साहाय्याने घरात पार्थिव श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत होतो. प्राणप्रतिष्ठापनेचे मंत्र चालू झाल्यावर मी माझ्या उजव्या हाताची बोटे श्री गणेशमूर्तीच्या हृदयावर ठेवली. तेव्हा मला श्री गणेशमूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी स्पंदने जाणवू लागली.

२. श्री गणेशमूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी जाणवलेल्या ठोक्यांची गती साधारणत: १०० प्रतिमिनिट असणे

आरंभी ‘मला भास होत असावा अथवा माझ्याच हृदयाची स्पंदने मला जाणवत असावीत’, असे मला वाटले. मी ‘श्री गणेशमूर्तीच्या हृदयावर हात ठेवल्यावर त्या ठोक्यांची गती साधारणतः प्रतिमिनिट १०० असावी’, असे मला वाटले; परंतु माझे हृदय एवढ्या जोराने धडधडत नव्हते. ‘मंत्र संपले’, असे समजून मी हात खाली घेतला; मात्र मंत्र चालूच होते; म्हणून मी पुन्हा श्री गणेशमूर्तीच्या हृदयावर हात ठेवला. तेव्हाही मला तशीच स्पंदने जाणवली.

३. ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे ‘ॲप’ लावून श्री गणेशाची पूजा केल्यावर प्रथमच अनुभूती येणे

मी किमान ३५ वर्षे घरी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे; मात्र अशी अनुभूती मला पहिल्यांदाच आली. पूर्वी मी श्री गणेशमूर्तीची शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठापना करत नव्हतो. ‘सनातन संस्थे’च्या संपर्कात आल्यावर मला ‘श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना कशी करावी ?’, हे समजले. ‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’वरील ‘ऑडियो’ लावून श्री गणेशाची पूजा केल्यानंतर मला पहिल्यांदाच अशी अनुभूती आली.

४. कृतज्ञता

अशी अनुभूती दिल्याबद्दल मी श्री गणेशाच्या चरणी आणि सनातन संस्थेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. हे ज्ञान परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचले; म्हणून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– वैद्य नीलेश निवृत्ती लोणकर, केडगाव, पुणे. (१०.९.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक