काँग्रेसने भारताची फाळणी केल्याने ‘भारत जोडो’ यात्रा पाकिस्तानातून चालू करावी !  

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसवर टीका

डावीकडून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि राहुल गांधी

गौहत्ती (आसाम) – काँग्रेसकडून ‘भारत जोडो’ या यात्रेला ७ सप्टेंबरपासून  तमिळनाडूच्या कन्याकुमारीतून प्रारंभ करण्यात आली आहे. यावर आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, वर्ष १९४७ मध्ये काँग्रेसनेच भारताची फाळणी केली. राहुल गांधी यांना जर ‘भारत जोडो’ यात्रा चालू करायची असेल, तर त्यांनी ती पाकिस्तानातून करावी. भारतात ही यात्रा चालू करण्याचा काय उपयोग ? भारत एकसंधच आहे.

देशातील महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात चालू झालेल्या या यात्रेची सांगता जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे. १५० दिवस चालणार्‍या या यात्रेत देशभरातील १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून तब्बल ३ सहस्र ५७० किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.