आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्याकडून भगवान श्रीकृष्णाचा ‘राक्षस’ म्हणून उल्लेख !

गोपाल इटालिया

कर्णावती (गुजरात) – आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी भगवान श्रीकृष्ण यांना राक्षस म्हटल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. द्वारका येथे एका सभेमध्ये भाषण करतांना त्यांनी ‘आता भगवान श्रीकृष्ण आणि भाजप या राक्षसांपासून सर्वांची सुटका करण्यासाठी अरविंद केजरीवाल हे अर्जुनाच्या रूपामध्ये आले आहेत’, असे विधान केले होते. अहीर समाजाचे सदस्य अमितभाई डांगर यांनी तक्रार केल्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इटालिया यांनी यापूर्वी वर्ष २०२१ मध्ये श्री सत्यनारायण कथा आणि श्रीमद्भागवत यांच्याविषयीही अपशब्द काढले होते.

या प्रकरणी भगवान श्रीकृष्णावर श्रद्धा असणार्‍या मालधारी समाजाचे नेते खिलन रबारी यांनी म्हटले की, मालधारी समाज भगवान श्रीकृष्णाचा अवमान सहन करणार नाही. जोपर्यंत इटालिया द्वारकेमधील गोमती घाटावर जाऊन भगवान श्रीकृष्णाची क्षमा मागत नाहीत तोपर्यंत मालदारी समाज त्यांना क्षमा करणार नाही.

संपादकीय भूमिका 

  • ज्यांना ‘भगवान कोण आणि राक्षस कोण ?’, हे ठाऊक नाही, ते समाजाला काय दिशादर्शन करणार ? अशा आसुरी मानसिकतेच्या राजकारण्यांना आजन्म कारागृहातच डांबले पाहिजे !
  • देशात सातत्याने हिंदूंच्या देवतांचा विविध माध्यमांतून होत असलेला अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक !