भ्रष्टाचाराने पोखरलेले महानगरप्रदेश विकास प्राधिकरण !
ठाणे, १ सप्टेंबर (वार्ता.) – तक्रारदारांच्या परिचयाच्या २ व्यक्तींच्या भूमीचा झोन दाखला देण्यासाठी प्रत्येकी १२ सहस्र रुपये याप्रमाणे एकूण २४ सहस्र रुपयांची लाच मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरण उपप्रादेशिक कार्यालयातील उपनियोजक शिवराज पवार (वय ३३ वर्षे) यांनी ३० ऑगस्ट या दिवशी तक्रारदाराकडे मागितली होती. याची तक्रार तक्रारदाराने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्याप्रमाणे १ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३.४० वाजता शिवराज पवार यांना तक्रारदाराकडून २४ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकार्यांनी रंगेहात पकडून अटक केली. पवार यांच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.