गुजरात उच्च न्यायालयाने मुसलमानांना फटकारले !
कर्णावती (गुजरात) – तुच्या शेवटच्या क्षणी धावत पळत येता. आम्ही या याचिकेवर विचार करणार नाही. जेव्हा पशूवधगृहांवर बंदी घातली जाते, तेव्हा तुम्ही आमच्याकडे येता. तुम्ही १-२ दिवस मांस खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही का ?, अशा शब्दांत गुजरात उच्च न्यायालयाने मुसलमानांना फटकारले. कर्णावती नगरपालिकाने जैन धर्मियांच्या पवित्र ‘पर्युषण’ सणाच्या निमित्त शहरातील सर्व पशूवधगृहे एक दिवसांसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याला ‘कुल हिंद जमीयत-अल कुरैश अॅक्शन कमिटी’ने उच्च न्यायालयात आव्हा दिले होते. त्यावर न्यायालयाने वरील शब्दांत त्यांना फटकारले.
“Restrain Yourself From Eating Meat For 1-2 Days”: Gujarat HC In Plea Against Slaughterhouse Closure @CharuSingh_345 @KundanKulshresh https://t.co/9PaktPyKC4
— Live Law (@LiveLawIndia) September 1, 2022