सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, यासाठी ‘ॲमेझॉन किंडल’वर सनातनचे श्री गणपतिविषयक ग्रंथ ‘ई-बूक’ स्वरूपात विनामूल्य वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ही विशेष सुविधा श्री गणेशचतुर्थीपासून केवळ २ दिवस असणार आहे.
या ग्रंथांमध्ये आपल्याला श्री गणेशाच्या उपासनेचे शास्त्र, श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तू का वापरतात ? श्री गणेशाला दूर्वा का आणि कशा वहाव्यात ? श्री गणेशाला गंध, हळद-कुंकू कशा पद्धतीने वहावे ? श्री गणेश पूजाविधी, तसेच उत्तरपूजाविधी आदी अनेक कृतींची शास्त्रीय माहिती मिळणार आहे. सर्व गणेशभक्त, तसेच भाविक यांनी या विनामूल्य ग्रंथसुविधेचा अवश्य लाभ घ्यावा ! हे ग्रंथ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या ३ भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर अध्यात्म, साधना आणि धर्मशास्त्र यांविषयक सनातनचे अन्य ग्रंथही ‘ई-बूक’ स्वरूपात ‘ॲमेझॉन किंडल’वर उपलब्ध आहेत.
विविध विषयांच्या ग्रंथांचा लाभ घेण्यासाठी आजच ‘डाऊनलोड’ करा, सनातनचे ‘ई-बूक’ स्वरूपातील ग्रंथ !
(‘ई-बूक’ : एखाद्या पुस्तकाचे ‘डिजिटल’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक’ स्वरूपातील रूपांतर ! इंटरनेटला जोडलेल्या संगणकाच्या किंवा ‘स्मार्टफोन’च्या साहाय्याने हे पुस्तक `डाऊनलोड’ करून वाचता येते.)
हे ग्रंथ ‘सनातन शॉप’ संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
मार्गिका : SanatanShop.com/eBooks
QR code द्वारे डाऊनलोड करा
ग्रंथ वाचल्यावर त्या संदर्भातील आपले अभिप्राय अवश्य कळवा (कमेंट करा) ! |