असदुद्दीन ओवैसी यांचा विरोध
बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरू महानगरपालिकाने ३१ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने शहरातील मांस विक्री आणि पशूवधगृहे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. यावर एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. ‘मुसलमानांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे. अशा आदेशाद्वारे मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे. गरीब मुसलमान व्यापार्यांची हानी केली जात आहे’, असा आरोप त्यांनी केला आहे. (हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांच्या वेळी मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे केली जातात, त्या वेळी ओवैसी गप्प का असतात ? – संपादक)
#MeatBan imposed in Bengaluru on Ganesh Chaturthi; BBMP circular accessed https://t.co/az0Ij0cUWX
— Republic (@republic) August 29, 2022
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील गावात सामूहिक नमाजपठण करणार्यांवर गुन्हा नोंद
मुरादाबाद जिल्ह्यातील दौलतपूर गावामध्ये सामूहिक नमाजपठण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २६ मुसलमानांवर गुन्हा नोंदवला आहे. यावरही ओवैसी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, भारतात आता मुसलमान नमाजपठणही करू शकत नाहीत का ? आता नमाजपठणासाठीही सरकार आणि पोलीस यांची अनुमती घ्यावी लागणार आहे ? पंतप्रधान मोदी यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. मुसलमानांना अशा प्रकारे दुय्यम दर्जाची वागणूक कधीपर्यंत चालू रहाणार ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (जर नियमभंग करून कुणी नमाजपठण करत असेल, तर त्याच्यावर पोलीस कारवाई करणारच ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या सणांच्या काळात असा आदेश संपूर्ण देशभरात का दिला जात नाही ? |