पाकच्या सैन्याने जवाहिरीला मारण्यासाठी त्याच्या आकाश मार्गाचा वापर करू दिला ! – तालिबानचा आरोप

पाकने आरोप फेटाळला !

काबूल (अफगाणिस्तान) – जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला काबुलमध्ये ठार मारण्यासाठी अमेरिकेने पाकच्या आकाशमार्गाचा वापर केला. यासाठी पाकच्या सैन्याने अनुमती दिली होती, असा दावा अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने केला आहे; मात्र पाकिस्तानने हा दावा फेटाळला आहे. अमेरिकेने ड्रोनद्वारे डागलेल्या क्षेपणास्त्राद्वारे जवाहिरी ठार झाला होता.
अफगाणिस्तानचा संरक्षणमंत्री मुल्ला याकूब म्हणाला, ‘अफगाणिस्तामध्ये ड्रोनचा झालेला अवैध उपयोग देशाच्या हवाई सीमंचे उल्लंघन करणारा आहे.’ या वेळी त्याला ‘हे ड्रोन कुठून येत आहेत ?’, असे विचारले असता त्याने ‘पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये येत आहेत’, असे त्याने सांगितले.