विद्यमान सरकारच्या काळात १३७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

विधानसभेतून…

अजित पवार, विरोधी पक्षनेते

मुंबई – राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र चालू आहे. राज्यात प्रतिदिन सरासरी ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून गेल्या ४५ दिवसांत १३७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींनी काय करायचे ? या सरकाला शेतकरी जवळचे वाटत नाही का ? याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी हे कृतीतून दाखवा, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केेले. राज्यात झालेल्या अतीवृष्टी आणि पूरपरिस्थिती यांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना साहाय्य देण्यासाठी विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्तावावर ते बोलत होते.

शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी चेतावणी देत अजित पवार म्हणाले की, शेतकर्‍यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी काढा. काहीही करा; पण शेतकर्‍यांना आत्महत्येपासून रोखा, असेही ते म्हणाले.