अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनकडून गतीने होत आहे बांधकाम !

नवी देहली – अरुणाचल प्रदेश राज्याला लागून असलेल्या भारत-चीन सीमेवरील  अनवाज जिल्ह्यातील नागरिकांनी एका व्हिडिओ बनवला आहे. यात चीन सैन्याकडून सीमेवर चालू असलेले बांधकाम दिसत आहे. त्यासाठी वापरण्यात येणारी मोठी वाहने आणि चिनी सैनिक दिसत आहेत. चालागम येथील हादिगरा-डेल्टा सिक्स या भारतीय सीमेमध्ये असणार्‍या सैन्याच्या चौकीजवळून हे चित्रीकरण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. चालागम हे भारत-चीन सीमेजवळील अरुणाचल प्रदेशजवळच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेला लागून असलेले शेवटचे ठिकाण आहे. सामान्यपणे या ठिकाणी जाण्यासाठी ४ दिवसांचा कालावधी लागतो. ‘प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ चीनच्या बाजूने ज्या वेगाने रस्ते बांधणी आणि इतर कामे केली जात आहेत, ती चिंतेत टाकणारी आहेत’, असे येथील गावकर्‍यांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

भारत चीनला अशा कृत्यांविषयी जाब कधी विचारणार ?