जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्यास कायमस्वरूपी वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याची चेतावणी !

पुणे – राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सध्या चालू आहे. त्यामध्ये शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्यास त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे, तसेच त्यांना बदल्यांच्या प्रक्रियेतूनही बाद केले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना राज्य सरकारने यासंदर्भातील अधिकार दिले आहेत. यासंदर्भात ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून अर्ज देण्याची मुदत संपल्यामुळे चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांना नव्याने अर्ज करण्याची संधी रहाणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

चुकीची माहिती भरणारे शिक्षक विद्यार्थ्यांना नीतीमत्तेचे शिक्षण काय देणार ?