पणजी, १७ ऑगस्ट (वार्ता.) – सरकारने अनुदानाऐवजी शाडूची माती आणि ‘मोल्डिंग मशीन’ (मातीला आकार देणारे यंत्र) द्यावे, अशी मागणी श्री गणेशाच्या मूर्ती बनवणार्या मूर्तीकारांकडून करण्यात आली आहे.
मूर्तीकार म्हणतात, ‘‘शाडूमातीची किंमत वाढली आहे, तसेच माती सिद्ध करणे आणि तिला आकार देणे कठीण होऊन बसले आहे. त्यासाठी ‘मोल्डिंग मशीन’ दिले तर काम करणे सोपे होईल. अगदी अल्प प्रमाणात मिळत असलेल्या अनुदानात ही समस्या सुटत नाही. त्यामुळे सरकारने अनुदान देण्याऐवजी शाडूची माती आणि ‘मोल्डिंग मशीन’ द्यावे.’’
श्री गणेशचतुर्थीला आता केवळ १४ दिवस शिल्लक आहेत आणि मूर्तीकार मूर्ती करण्यात व्यस्त आहेत.