बाडनेर (राजस्थान) येथील एका गावातील सरकारी शाळेत ध्वजारोहणानंतर अफूचे वाटप

सरकारी शाळेत १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर गावकरी आणि सरकारी प्रतिनिधीना ‘अफू’चे वाटप !

बाडनेर (राजस्थान) – येथील गुडमालानीच्या रावली नाडी या सरकारी शाळेत १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर गावकरी आणि सरकारी प्रतिनिधी शाळेत बसले होते. त्यांना अफू हे अमली पदार्थ वाटण्यात आले.

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर शिक्षणाधिकार्‍यांना चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

शाळेला ‘अमली पदार्थ मिळण्याचा अड्डा’ बनवणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा !