नवी देहली – इस्रायल हा असा देश आहे जेथे शेतकर्यांपासून ते अधिकार्यांपर्यंत प्रत्येकाच्या मुलांना सैनिकी शिक्षण घेणे बंधनकारक आहे. जर असे भारतात केले, तर तरुणांमध्ये पूर्वीपासून असलेला राष्ट्रप्रेम अजून चमकेल. यातूनच आतंकवाद आणि जातीयवाद यांविषयी तरुणांची होणारी दिशाभूलही रोखली जाईल. एखाद्या देशाची चांगली गोष्ट स्वीकारण्यात अडचण आहे ?, असा प्रश्न केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनी उपस्थित केला आहे.
देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबले जात आहे. त्याला काही जणांकडून विरोध केला जात आहे. यावर कौशल किशोर म्हणाले की, तिरंग्याला विरोध करणारे राष्ट्रप्रेमी असू शकत नाहीत. यापूर्वी राष्ट्रगीत (जन गण मन) आणि राष्ट्रीय गीत (वन्दे मातरम्) यांनाही विरोध झाला आहे. जनतेला हे सर्व ठाऊक आहे. ती याविषयी जागरूक आहे.
संपादकीय भूमिकाकेंद्रीय राज्यमंत्र्यांनी हा विचार त्यांच्या सरकारसमोर मांडून त्यावर निर्णय घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते ! |