राजौरी येथील सैन्यतळावरील आक्रमणात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त, तर २ आतंकवादी ठार

प्रतिकात्मक छायाचित्र

राजौरी (जम्मू-काश्मीर) – येथून २५ किमी अंतरावरील परगल येथील सैनिकी तळावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले, तर २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. हे दोघेही आतंकवादी आत्मघाती स्फोट करणार होते. ते उरी येथे झालेल्या सैन्यतळावरील आक्रमणासारखे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते. त्यापूर्वीच त्यांना ठार करण्यात आले. ‘हे आक्रमण नेमक्या किती आतंकवाद्यांनी केले ? आणि किती पळून गेले ?’, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारतीय सैन्याने येथे आता शोधमोहीम हाती घेतली आहे.

१८ सप्टेंबर २०१६ या दिवशी काश्मीरच्या उरीमधील सैन्यतळावर पहाटे ५ वाजून ४ मिनिटांनी आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. यात सैन्याच्या १९ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती, तर ४ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते. यानंतर भारताने २८ सप्टेंबर २०१६ च्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मिरात आतंकवाद्यांच्या ठिकाणावर सर्जिकल स्ट्राइक करून ३८ ते ४० आतंकवाद्यांना ठार केले होते.

संपादकीय भूमिका 

काश्मीरमध्ये प्रतिदिन आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असूनही तेथील जिहादी आतंकवाद नष्ट होत नाही; कारण नवीन आतंकवाद्यांची निर्मिती पाकमध्ये चालूच आहे. पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होईल !