फतेहपूर (उत्तरप्रदेशात) येथे मुसलमानांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

प्रतीकात्मक छायाचित्र

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. जबरील कुरेशी या मुसलमान तरुणाने त्याच्या ४ मुसलमान साथीदारांच्या साहाय्याने या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर कुरेशी आणि त्याचे चार साथीदार यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, तसेच या आरोपींनी पीडित मुलीने इस्लाम धर्म न स्वीकारल्यास वडील आणि भाऊ यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जबरील कुरेशी आणि त्याचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी भ्रमणभाष क्रमांकाच्या आधारे अपहरण केलेल्या मुलीला कह्यात घेतले; मात्र मुख्य आरोपी जबरील कुरेशी त्याच्या चार साथीदारांसह अद्याप फरार आहेत. विश्‍व हिंदु परिषदेचे प्रांतीय सरचिटणीस वीरेंद्र पांडे यांनी पोलीस ठाणे गाठून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. ‘लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल’, असे पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

अशा नराधमांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा सुनावणे आवश्यक !