(म्हणे) ‘१५ ऑगस्टला राष्ट्रध्वज नाही, तर ‘निशान साहिब’ फडकावा !’

शिरोमणी अकाली दलाचे खासदार सिमरनजीत सिंह मान यांचे राष्ट्रद्रोही विधान !

शिरोमणी अकाली दलाकडून मान यांच्यावर टीका

(‘निशान साहिब’ हा शिखांचा ध्वज आहे.)

शिरोमणी अकाली दलाचे खासदार सिमरनजीत सिंह मान

संगरूर (पंजाब) – शिरोमणी अकाली दलाचे संगरूर येथील खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी लोकांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाऐवजी शिखांचा ध्वज ‘निशान साहिब’ फडकावण्याचे आवाहन केले आहे. या वेळी त्यांनी केंद्रशासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानावरही टीका केली.

मान यांनी भारतीय सैनिकांना ‘शत्रू’ संबोधत म्हटले की, (खलिस्तानी आतंकवादी) जरनैल सिंह भिंडरांवाले हा शत्रू सैन्याशी लढत हुतात्मा झाला. शीख हा स्वतंत्र आणि वेगळा समुदाय आहे. दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी मात्र मान यांच्या वक्तव्यांवर टीका केली असून, ‘भारतीय ध्वज सर्वांचा आहे आणि पंजाबच्या लोकांना त्याचा अभिमान आहे’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तानचे उदात्तीकरण करणार्‍या अशा खासदाराच्या वक्तव्याचा निषेध करणे पुरेसे नसून शिरोमणी अकाली दलाने त्याला बडतर्फ केले पाहिजे !