श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देणार

श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांचे आश्‍वासन

श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या (डावीकडे) भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागळे (उजवीकडे)

कोलंबो (श्रीलंका) – आम्ही भारतीय पर्यटकांसाठी रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देण्यावर भर देणार आहोत, असे विधान श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी केले. श्रीलंकेत रामायणाशी संबंधित ५२ पर्यटनस्थळे आहेत. सध्या श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी श्रीलंका पर्यटनवाढीवर भर देऊ इच्छित आहे. या संदर्भात जयसूर्या यांनी भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागळे यांची भेट घेतली.

भारतीय उच्चायुक्तालयाने ट्वीट करून सांगितले की, सनथ जयसूर्या यांनी उच्चायुक्तांची भेट घेतली. या वेळी भारत आणि श्रीलंकावासीय यांच्यातील संबंध दृढ करण्यावर आणि श्रीलंकेतील अर्थव्यवस्था सुधारण्याचा एक भाग म्हणून पर्यटनाला चालना देण्यावर चर्चा झाली.