पाकमध्ये आत्मघाती आक्रमणात ४ सैनिक ठार, तर ८ सैनिक घायाळ

प्रातिनिधिक छायाचित्र

वजीरिस्तान (पाकिस्तान) – येथे एका आत्मघातकी आतंकवादी आक्रमणात पाकच्या ४ सैनिकांचा मृत्यू झाला. पाकच्या सैन्याच्या एका वाहनाला आतंकवाद्यांनी रिक्शाद्वारे धडक दिल्यावर झालेल्या शक्तीशाली स्फोटात या चौघांचा मृत्यू झाला. या आक्रमणात ७ सैनिकही घायाळ झाले. पत्तासी तपासणी नाक्यावर ही घटना घडली.

या घटनेविषयी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दुःख व्यक्त केले आहे. ‘आतंकवाद्यांचा उद्देश आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. (पाक जे पेरतो आहे, तेच तेथे उगवत आहे आणि स्वतःच्या कर्माचे फळ त्यांना भोगावे लागत आहे. एक दिवस पाकमधील जिहादी आतंकवादी पाकचे तुकडे केल्याखेरीज रहाणार नाहीत ! – संपादक)