पुलवामा येथे ग्रेनेडच्या आक्रमणात बिहारच्या कामगाराचा मृत्यू, तर दोघे जण घायाळ

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथील गदुरा भागात जिहादी आतंकवाद्यांनी रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांवर ग्रेनेडद्वारे केलेल्या आक्रमणात बिहारमधील एका कामगाराचा मृत्यू झाला, तर २ जण घायाळ झाले. महंमद मुमताज असे मृताचे नाव आहे. यासह या आक्रमणात महंमद आरिफ आणि महंमद मजबूल हे पिता अन् पुत्र घायाळ झाले. हे तिघेही येथील टेंट हाऊसमध्ये काम करत होते. ते सूती चादर बनवत होते.

यापूर्वी एप्रिल मासात आतंकवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील लाजूरा येथेच  बिहारच्याच २ कामगारांवर गोळीबार केला होता. त्यात ते दोघेही घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे अपरिहार्य !