निधन वार्ता

ठाणे – कळवा (जिल्हा ठाणे) येथील सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या अंजली सुरेश पाटील यांच्या आई श्रीमती प्रमिला बळीराम इंगळे (वय ८७ वर्षे) यांचे ३१ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून, ४ मुली, ३ जावई आणि ९ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार पाटील कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.