गोडोली तळे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास सातारा नगरपालिकेची संमती !

सातारा नगरपालिका

सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – गोडोली तळे परिसरात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी शिव-शंभूप्रेमी आणि ‘शाहूनगरी फौंडेशन’ यांच्या वतीने पालिकेकडे करण्यात आली होती. या मागणीला सातारा नगरपालिकेच्या वतीने संमती देण्यात आली असून धोरणात्मक निर्णयासाठी, तसेच जिल्हास्तरीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला, अशी माहिती ‘शाहूनगरी फौंडेशन’च्या संस्थापक-अध्यक्षा श्रीमंत वृषालीराजे भोसले यांनी दिली.

श्रीमंत वृषालीराजे भोसले पुढे म्हणाल्या की, सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी असून येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज वास्तव्यास आहेत. राजधानी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे; मात्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा नाही, हे क्लेशदायक आहे. यासाठी  पुतळ्याची मागणी करण्यात आली होती.