कूचबिहार (बंगाल) येथे ‘पिकअप’ वाहनामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने १० भाविकांचा मृत्यू

कूचबिहार (बंगाल) – येथे पिकअप वाहनामध्ये विजेचा प्रवाह उतरल्यामुळे १० भाविकांचा मृत्यू झाला, तर १६ जण होरपळले. त्यांना उपचारांसाठी जलपायगुडीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे भाविक या वाहनातून शिवमंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जात होते. त्यांच्या वाहनात डीजे (मोठी संगीत यंत्रणा) वाजत होता. जनरेटरच्या वायरमध्ये शॉर्ट सर्कीट (बिघाड) झाल्यामुळे वाहनात विजेचा प्रवाह उतरला आणि सर्वांना विजेचा धक्का बसला. वाहनाच्या चालकाला विजेचा धक्का बसला नाही. तो पसार झाला. पोलिसांनी पिकअप कह्यात घेतली आहे.

संपादकीय भूमिका 

वाहनामध्ये विद्युत यंत्रणा करतांना आवश्यक ती काळजी न घेणार्‍या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवू नये ?