(म्हणे) ‘भजन गाणे शरीयतच्या विरुद्ध !’

भगवान शिवाचे भजन गायल्याने मुसलमान गायिकेवर देवबंदच्या उलेमाकडून टीका

(उलेमा म्हणजे ‘इस्लामच्या धार्मिक नियमांचे पालन होत आहे ना ?’ याकडे लक्ष ठेवणारा)

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – ‘यू ट्यूब’वरील गायिका फरमानी नाझ यांनी कावड यात्रेसाठी भगवान शिवाचे ‘हर हर शंभू’ हे भजन म्हटल्याने देवबंदच्या उलेमांनी टीका करत ‘ते शरीयतच्या विरोधात आहे’, असे म्हटले आहे. उलेमांनी म्हटले आहे की, इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारचे गाणे म्हणणे अयोग्य आहे. हे इस्लामच्या विरोधात आहे. त्यामुळे फरमानी यांनी अशा गोष्टींचा त्याग केला पाहिजे.

कलाकाराला कोणताही धर्म नसतो ! – फरमानी नाझ  

यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना फरमानी यांनी म्हटले आहे की, मी एक कलाकार आहे. त्यामुळे मला प्रत्येक प्रकारची गाणी गावी लागतात. कलाकाराला कोणताही धर्म नसतो. मी कव्वाली आणि भक्तीगीत दोन्हींमध्ये जीव ओतून गाते. त्यासाठी मी उलेमा अथवा अन्य कुणाचीही पर्वा करत नाही. कलाकार हिंदु आणि मुसलमान पाहून कलेचे सादरीकरण करत नाही.