पुणे येथे नायजेरियन दांपत्याकडून १ कोटी ३० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

पुणे – कोकेन, एम्.डी. अशा प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री करणार्‍या उगुचुकु इम्यॅन्युअल आणि पत्नी ऐनीबेली ओमामा व्हिवान या नायजेरियन दांपत्याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाच्या वतीने अटक करण्यात आली आहे. १ कोटी ३१ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

(तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावणार्‍या नायजेरियन लोकांविरुद्ध शोधमोहीम घेऊन अमली पदार्थाचे जाळे नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे ! – संपादक)