अर्पिता मुखर्जी यांच्या दुसर्‍या घरातून आढळली २९ कोटी रुपयांची रोकड !

अर्पिता मुखर्जी

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील शिक्षक घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) राज्याचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या समजल्या जाणार्‍या अर्पिता मुखर्जीं यांच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बेलघरिया येथील दुसर्‍या घरावर धाड टाकून २९ कोटी रुपयांची रोकड आणि ५ किलो सोन जप्त केले. यापूर्वी त्यांच्या एका घरावर टाकलेल्या धाडीत २१ कोटी रुपये आणि १ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवले आहे.

संपादकीय भूमिका

इतकी रक्कम गोळा करेपर्यंत राज्यातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? कि त्यांना याकडे दुर्लक्ष करण्याचा आदेश देण्यात आला होता ?