विदर्भात अडीच मासांत ८१२ मुली बेपत्ता !

बुलढाणा – विदर्भातील जिल्ह्यांतून १ मे ते २० जुलै या कालावधीत ८१२ मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ यांसह अन्य काही संकेतस्थळांवर याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘या युवती किंवा महिला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवल्या गेल्या नाहीत ना ?’, असा संशय अनेक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून मुलींना वेश्याव्यवसायासाठी विकणे किंवा विदेशात पाठवण्यासाठी विकणे, अशा घटना यापूर्वी मोठ्या प्रमाणात घडल्याने त्या दृष्टीनेही शोध घ्यायला हवा’, अशी चर्चा आहे. (यावरून ‘महाराष्ट्रातही लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याची आवश्यकता आहे’, हे लक्षात येते ! – संपादक) विदर्भातील बेपत्ता मुली आणि महिला यांची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.


अनेक पालक स्वतःच्या प्रतिमेपोटी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करत नसल्याने प्रत्यक्षात फसवल्या गेलेल्या मुलींची संख्या किती असेल, याची कल्पनाही येऊ शकत नाही.

राज्यात युवती बेपत्ता होत असल्याविषयी अडीच वर्षापूर्वी विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना बेपत्ता महिला आणि मुली यांच्याविषयीे अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अन् पुरुष पोलीस अधिकार्‍यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या होत्या.

संपादकीय भूमिका

  • राज्यातील एका भागातून इतक्या मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे आणि  आतापर्यंत त्यांचा थांगपत्ता न लागणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! याला उत्तरदायी असणार्‍यांवरही सरकारने कारवाई केली पाहिजे !
  • महिला आयोग, विविध पक्षांच्या महिला लोकप्रतिनिधी, महिलांच्या हक्कांविषयी काम करणार्‍या महिला संघटना आदी आता या बेपत्ता मुलींविषयी आवाज का उठवत नाहीत ?
  • गृहविभागाने या समस्येच्या मुळाशी जाऊन तत्परतेने कठोर उपाययोजना काढल्या पाहिजेत !